News

चित्रपटाच्या तिकिटासाठी पैसे दिले नाही म्हणून वडलांना जाळले

24Views

तामिळनाडू: 

चित्रपटाच्या तिकीटासाठी पैसे दिले नाही म्हणून मुलाने वडिलांना जाळल्याची धक्कादायक घटना तामिळनाडूच्या वेल्लोर शहरात घडली आहे. या प्रकरणी अजिथ कुमार या तरुणाला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

पांडियन (४५) हे वेल्लोरमध्ये एक मुजरीचे काम करतात. पत्नीशी भांडण झाल्यामुळे काही दिवसांपासून ते घराबाहेर रस्त्याच्या कडेला राहत होते. गुरुवारी सकाळी ते पहुडले असताना त्यांचा मुलगा अजिथ कुमार याने येऊन त्यांना उठवले. ‘विश्वासम’ या चित्रपटाला जायचे असून तिकिटासाठी मला पैसे द्या, अशी मागणी त्यानं केली. तेव्हा पांडियन यांनी त्याला सरळ नकार दिला. त्यामुळं संतापलेला अजिथ काही वेळानंतर घरातून रॉकेलची बाटली घेऊन आला. त्यानं मागचा पुढचा विचार न करता वडिलांच्या चेहऱ्यावर आणि हातावर रॉकेल ओतले आणि आग लावून पोबारा केला. पांडियन यांची किंकाळी ऐकून आजूबाजूच्या मजुरांनी त्यांच्या दिशेने धाव घेतली. आग आटोक्यात आणत लगेच त्यांनी पांडियन यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. पांडियन यांच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत.

अजिथ कुमार हा वेल्लोरमध्येच एका बांधकाम व्यावसायिकाकडं गवंडीकाम करतो. अल्पवयीन असल्यामुळं त्याला अटक करण्यात आलेली नाही.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply