News

‘चीट इंडिया’ची माघार ‘ठाकरे’चा मार्ग मोकळा.

25Views

मुंबई: –

अभिनेता इम्रान हाश्मीचा आगामी चित्रपट ‘चीट इंडिया’च्या प्रदर्शनाची तारीख बदलल्याने आता ‘ठाकरे’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग सुकर झाला आहे. इम्रान हाश्मीचा ‘चीट इंडिया’ आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित बायोपिक ‘ठाकरे’ हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी म्हणजेच २५ जानेवारीला प्रदर्शित होणार होते. मात्र या दिवशी फक्त ‘ठाकरे’ हा एकमेव चित्रपट प्रदर्शित व्हावा, असे निर्मात्यांचे म्हणणे असल्याने ‘चीट इंडिया’ला प्रदर्शनाची तारीख बदलावी लागली आहे. त्यामुळे हा चित्रपट २५ जानेवारी ऐवजी आता एक आठवडा अगोदरच म्हणजेच १८ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

इम्रानन आपल्या ट्विटर हँडलवर ‘चीट इंडिया’चे नवे पोस्टर पोस्ट करत नव्या तारखेची घोषणाही केली आहे. ‘चीट इंडिया’ हा शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर भाष्य करणारा चित्रपट आहे. बऱ्याच काळानंतर या चित्रपटातून इम्रान हाश्मी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. तर ‘ठाकरे’ हा चित्रपट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित असून यात बाळासाहेब ठाकरे यांची व्यक्तिरेखा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने साकारली आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply