News

चीनवरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र.

12Views

नवी दिल्ली: –

पुलवामा हल्ला घडवून आणणाऱ्या ‘जैश-ए-मोहम्मद’चा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या प्रस्तावात खोडा घालणाऱ्या चीनवरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं. कमकुवत मोदी हे शी जिनपिंगना घाबरले. भारताविरुद्ध कृती करणाऱ्या चीनविरुद्ध मोदींच्या तोंडून चकार शब्दही निघाला नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

‘जैश’चा म्होरक्या मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघात फेटाळण्यात आला. फ्रान्सने याबाबतचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघात आणला होता. मात्र, चीनने आपल्या व्हिटोचा वापर करत हा प्रस्ताव फेटाळून लावला. चीनने कायमच मसूदला पाठिशी घातले आहे. २००९, २०१६ आणि २०१७मध्ये या संदर्भातील प्रस्तावावर चीनने नकाराधिकाराचा वापर करत खोडा घातला होता. यावरून राहुल यांनी ट्विटद्वारे मोदींना लक्ष्य केलं. भारताविरोधात चीननं केलेल्या कृतीवर मोदींनी एक शब्दही काढला नाही. कमकुवत मोदी चीनच्या शी जिनपिंग यांना घाबरले, अशी टीका राहुल यांनी केली. पंतप्रधान मोदी गुजरातमध्ये शी जिनपिंग यांच्यासोबत झोके घेतात, दिल्लीत गळाभेट घेतात आणि चीनमध्ये त्यांच्यासमोर झुकतात. ही मोदींची ‘चीन नीती’ आहे, असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply