News

चोख पोलीस बंदोबस्तात नववर्षाचे स्वागत

16Views

 औरंगाबाद :-

बोचरी थंडी, एकमेकांना स्वागतासाठी उठणारे हात, हॅपी न्यू इयरची साद आणि कडक पोलिस बंदोबस्त…महत्त्वाच्या प्रत्येक चौकात वाहनधारकांची तपासणी…मद्यपींवर रात्री उशिरापर्यंत दाखल होणारे गुन्हे…पहाटे पाचपर्यंत बीअर बारला परवानगी असताना पोलिसांनी तरुणाईंना केलेला अटकाव…थर्टी फर्स्टच्या मध्यरात्रीनंतर फसफसणारा उत्साह…हेच चित्र होते नवर्षाच्या स्वागताचे…

शहरात सोमवारी रात्री नववर्षाच्या स्वागताच्या बंदोबस्तासाठी तब्बल तीन हजार पोलिस रस्त्यावर होते. हर्सूल, जालना नाका, बीड नाका, पैठण रोड नाका, दौलताबाद टी पॉइंट आणि वाळूज नाका मार्गावर चेकपोस्ट लावण्यात आले होते. शहरात ६५ ठिकाणी फिक्स पॉइंट तैनात करण्यात आले होते. महत्त्वाच्या चौकात रात्री दहानंतर ब्रीथ अॅनालायझरच्या मदतीने वाहनधारकांची तपासणी करण्यात येत होती. ड्रंक अँड ड्राइव्ह मोहिमेअंतर्गत मद्यपी वाहनधारकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. नववर्ष साजरे करण्यासाठी शहरातील निराला बाजार, कॅनाट प्लेस भागात तरुणाईने गर्दी केली होती. रात्री अकरानंतर शहरातील सर्व प्रमुख मार्गावर पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त दिसून आला. वेगाने दुचाकी चालवणाऱ्या वाहनधारकांची पोलिसांकडून समजूत घालण्यात येत होती.

मार्ग केला मोकळा

मध्यरात्री बारा वाजेनंतर नववर्षाचे स्वागत करण्यासाठी रस्त्यावर तरुणांची गर्दी झाली. क्रांतीचौक, मोंढा नाका, सेव्हन हिल्स् आणि सिडको बसस्टँड जवळील उड्डाणपुलावर हौशी तरुणांनी फोटोसेशनसाठी गर्दी केली. पोलिसांनी ही गर्दी पुलावरून पिटाळून लावत वाहतुकीचा मार्ग मोकळा केला.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply