News

चौकीदार चोरच नव्हे, डरपोकही: राहुल.

8Views

मुंबई: –

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मुंबईतील एमएमआरडीए मैदानात झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. ‘चौकीदार चोर है’ च्या घोषणा तर त्यांनी दिल्याच मात्र ‘चौकीदार चोरच नव्हे तर डरपोकही आहे,’ असे ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी वारंवार खोटे पसरवत आहेत. तुम्हाला खरं ऐकायचं असेल तर इथे या, पण खोटं ऐकायचं असेल तर नरेंद्र मोदींच्या सभांना जा, अशी टीका राहुल यांनी केली. मोदींनी देशातल्या १५ उद्योगपतींना ३.५ लाख कोटींचं कर्जवाटप केलंय, शेतकरी मात्र उपाशी आहे. हे खोटं बाहेर पडेल याची मोदींना भीती आहे, असं म्हणत राहुल यांनी मोदींना ‘डरपोक’ म्हटलं. मुंबई ही स्वत:च एक स्मार्ट सिटी आहे, पण मुंबईकरांना अनेक समस्या भेडसावत आहेत, असे ते म्हणाले.

… तर झोपडीधारकांना घर

काँग्रेसच्या हाती सत्ता दिली तर मुंबईतल्या झोपडीधारकांना झोपडपट्टी विकास योजनेंतर्गत ५०० चौ. फुटांचं घर देणार, अशी घोषणा राहुल यांनी केली.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply