News

जगभरात आज गुगलची सेवा तांत्रिक अडचणींमुळे ठप्प झाली आहे.

9Views

मुंबई:

जगाची आणि आपल्या नित्यक्रमाची खबरबात घेण्यासाठी सवयीनुसार सकाळी-सकाळी संगणक उघडणाऱ्या जगभरातील कोट्यवधी नेटकरांना आज धक्का बसला आहे. कारण, गुगलनं आज सकाळपासूनच असहकार पुकारला आहे. तांत्रिक अडचणींमुळं गुगलच्या सेवेत अडथळा येत आहे. पाठवलेले ई-मेल समोरच्याला मिळत नाहीएत. मिळालेच तर डाउनलोड होत नाहीएत. त्यामुळं युजर्स हैराण झाले असून सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस पडला आहे.

गुगल ड्राइव्ह, जीमेलसोबत यू-ट्यूबच्या सेवेतही हेच अडथळे येत आहेत. नेटकरांच्या तक्रारींची गुगलनं तातडीनं दखल घेत दिलगिरी व्यक्त केली आहे. युजर्सना येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. लवकरच सेवा पूर्ववत होईल,’ असा खुलासा गुगलनं केला आहे. पहिल्यांदा आपलं नेटवर्क तपासा आणि पुन्हा प्रयत्न करा, असा सल्लाही गुगलनं युजर्सला दिला आहे.

काय येताहेत अडचणी?

>> ई-मेल सेंड होत नाहीत. मेल येत नाहीत.

>> आलेले व पाठविलेले ई-मेल व्हिडिओ, डॉक्युमेण्ट्स डाउनलोड होत नाहीत

>> गुगल मॅप्सवर ठिकाणे शोधणं कठीण झालंय

>> यू-ट्यूबवर व्हिडिओ अपलोड होण्यासाठी प्रचंड वेळ लागतो आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply