News

जगायच कशासाठी हेच माहिती नसते: नाना पाटेकर

22Views

 कराड :-

‘जगायच कशासाठी हे अनेकांना माहिती नाही. मला खूप काय करायचाय, मात्र काय करायचाय हे ही तरुणाईसह अनेकांना माहिती नाही. अजंठा आणि वेरूळूच्या तुटलेल्या मूर्तीत सौदर्य शोधण्यापेक्षा बाबा आमटे यांनी होते नव्हते, त्या सर्वांचा त्याग करून आनंदवनच्या माध्यमातून समाजसेवा सुरू केली. यासाठी तरुणांनी जीवन का जगावं, हे हेमलकसाला जाऊन आमटे कुटुंबीयांकडून शिकले पाहिजे,’ असे मत अभिनेता नाना पाटेकर यांनी व्यक्त केले. घारेवाडी (ता. कराड) येथील शिवम्‌ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित बलशाली युवा हृदय संमेलनात रविवारी चित्रपट अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्यासह परराज्यातून आलेल्या युवकांना मार्गदर्शन केले. या वेळी पाटेकर बोलत होते.

या वेळी शिवम प्रतिष्ठानचे प्रमुख मार्गदर्शक इंद्रजित देशमुख, अभिनेते मकरंद अनासपुरे, चित्रपट अभिनेते समृद्धी जाधव, कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, कराड मर्चंट समुहाचे सत्यनारायण मिणीयार यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, संचालक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या वेळी बोलताना मकरंद अनासपुरेम्हणाले, ‘अलिकडे तरुणांमध्ये फोनवर सेल्फीमॅनिया सुरू झाला आहे. सेल्फीमुळे नोकरी मिळत नाही किंवा दोन घास अन्न मिळत नाही. त्यामुळे तो सोडून देत काळाची गरज ओळखून पावले टाकता आली पाहिजेत. आपल्या जीवनाचा फुकटचा हेलपाटा होऊ नये, यासाठी शिवम्‌च्या संमेलनात सहभागी झाला आहात, हे फार महत्वाची बाब आहे. सेल्फी काढणाऱ्याचे इंप्रेशन पडत नाही, पण शिवम्‌च्या कार्यकर्त्यांचे पडते, हे आदर्श संस्कारांचा परिपाक आहे.’

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply