News

जम्मू-काश्मीरमधील सोपोरमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा.

27Views
श्रीनगर:
बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलानं आज एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले. या चकमकीच्या पार्श्वभूमीवर सोपोरसह आसपासच्या परिसरातील मोबाइल व इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.

सोपोरमधील वारपोरा गावात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली होती. दहशतवादी असलेल्या ठिकाणाला जवानांनी चारी बाजूंनी घेरले. आपण घेरलो गेल्याचे लक्षात येताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. त्यात एक दहशतवादी मारला गेला. मात्र, आणखी काही दहशतवादी या गावात असून चकमक अद्याप सुरू आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply