nagpurruralNews

जय भोले बाबा …….ने नांद दुमदुमले.

58Views

नांद :-

प्रतिनिध :-राम वाघमारे

टाळ मृदुगांचा निनाद, भगव्या पताका डोक्यावर तुळशी वृंदावन आणि तोंडी जय भोलेनाथाच्या जयघोषाने शुक्रवारी  नांद दुमदुमले. निमित्त होते शिवरात्री महोत्सवाचे.  आज सकाळपासून दिंडी व पालखी सोहळा पार पडला.  वारक-यांची अलोट गर्दीने डोळ्यात साठवावी अशीच होती.

नांद नदीच्या पात्रात बसलेले देवाधिदेव महादेवाचे मंदिर व राजहंस बाबाचा मठ हा गावच माझे पंढरपूर म्हणुन ओळख असलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिर या महाशिवरात्री मोहत्सवानिमीत्य पालखी सोहळ्याचे आयोजन होते. या दिंडीत आलेसुर,वणी सायगाव व जवळपास सर्वच गावातील  भजनी मंडळ व भजनी दिंड्या सहभागी होत्या. डोळ्याचे पारणे फेडणा-या या सोहळ्याचे साक्षीदार होते भक्तीरसाचा आनंद घेण्यासाठी हजारो भाविकांनी परिसरातील गावातून हजेरी लावली.

सकाळी 10 वाजता महादेवाची व राजहंस महाराजाची पालखी दिंडी परिक्रमासाठी मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर आली महादेव घाट देवस्थान येथून निघालेल्या या पालखी सर्व प्रथम नांद नदी च्या मधोमध आली तेव्हा येथून पुढे जात असताना जणूकाही चंद्रभागा नदिचे तिरी असल्याचा भास होत होता. या दिंडी पालखीचे स्वागत साठी अख्या गावात रांगोळ्या रस्त्यावर सजावट केली होती. दिंडीत सामील वारक-यांचे पाय धुवून कुमकूम टिळा लावला जात होता. जागोजागी भाविकांचे स्वागत केले जात होते. ग्रामस्थांचे वतीने ठिकठिकाणी उपवासाचा नाश्ता, चहा , शरबताची व पाण्याची व्यवस्था केली होती.

ठिकठिकाणी विद्युत रोषणाई व स्वागतार्ह बॅनर होडींग ने नांद भध्ये झगमगाटात सजलेली होता. जणू काही दिवाळी सणाची आठवण करून देत होती

या निमित्ताने बुधवारी  6 रोजी महाकाला व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे जवळजवळ दरवर्षी प्रमाणे 20000 भाविक या महाशिवरात्री महाप्रसादाचा आस्वाद घेतात या वेळी जास्तीत जास्त भाविकांची या महोत्सवात सहभागी होण्यासाठी महादेव देवस्थानचे अध्यक्ष सुरेश वाढई यांनी भाविकांना  सादर आमंत्रित केले आहे

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply