News

जुम्मा प्यारेवाले यांची अकोला येथे बदली.

स्वरूप खरगे रामटेक चे नवे सिओ ?

19Views

रामटेक:-

रामटेक तालुका प्रतिनिधी- रामटेक नगरपालिकेचे विद्यमान मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांची अखेर रामटेक येथून बदली करण्यात आली. त्यांना नगर प्रशासन अधिकारी म्हणून अकोला येथे पाठविण्यात आले आहे.या आशयाचा अधिकृत आदेश नगर विकास विभागाचे सहसचिव सं.श. गोखले यांनी दिनांक 9 जानेवारी 2019 रोजी जारी केला आहे. रामटेक नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून जुम्मा प्यारेवाले हे सातत्याने वादग्रस्त ठरले होते. रामटेक नगरपालिकेचे अध्यक्ष व सदस्यांनी त्यांच्या अनेक तक्रारी शासनाकडे व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे कडे गेल्या होत्या. अलीकडेच रामटेक येथे विकास कामांची आढावा बैठक चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली होती. तेव्हा अनेक नगरसेवकांनी तक्रारी उपस्थित केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर थेट सभेतूनच नगरविकास खात्याच्या सचिवांना फोन करून या मुख्याधिकारींना रामटेक येथून हलवावे असे निर्देश दिले होते.सभेतही त्यांनी जुम्मा प्यारेवाले यांच्यावर आगपाखड करून आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांची बदली अपेक्षित मानली जात होती. आपण अमरावती विभागातील कारंजा लाड येथील मूळ रहिवासी असून आपल्या वडिलांच्या प्रकृती कारणाने अमरावती विभागात मुर्तीजापुर,अकोला किंवा वरुड येथे मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती करण्यासाठी रामटेकहून बदली करण्यात यावी अशा प्रकारचा विनंती अर्ज मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी एप्रिल -2018 मध्ये दिला होता. त्यानुषंगाने आपली झालेली बदली आपल्या मर्जीने झाली असून आपण त्याने आनंदी झालो आहोत. अशी प्रतिक्रिया प्यारेवाले यांनी व्यक्त केली. एकूणच ज्यांची बदली झाली ते व ज्यांना बदली हवी होती असे दोघेही या आदेशाने आनंदी झाले आहेत.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply