News

जे. जे. रुग्णालयात डॉक्टरांवर हल्ला

49Views

मुंबईतील जे. जे. रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांनी दोन निवासी डॉक्टरांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. यात एका डॉक्टरला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या ‘मार्ड’नं या हल्ल्याच्या निषेधार्थ काम बंद आंदोलनाची हाक दिली आहे.

रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ११च्या सर्जरी रूममध्ये आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. एका रुग्णाच्या चौघा नातलगांनी अचानक दोन निवासी डॉक्टरांना लक्ष्य केलं. त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाण झालेल्यांमध्ये एका महिला डॉक्टरचा समावेश आहे. डॉक्टरांना मारहाण केल्यानंतर हल्लेखोरांनी रुग्णालयातील वैद्यकीय साहित्याची व कागदपत्रांची नासधूस केली. हा संपूर्ण प्रकार रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा प्रकार नेमका कशामुळं घडला हे कळू शकलेलं नाही. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply