NewsSports

टीम इंडियाच्या मेन्यूत बीफ नाही; BCCIचा सेफ गेम!

53Views

मुंबई: –

यावर्षी ऑगस्टमध्ये इंग्लंड दौऱ्यावेळी टीम इंडियाच्या लंच मेन्यूत ‘ब्रेस्ड बीफपास्ता’च्या समावेशावरून टीकेचे धनी ठरलेल्या बीसीसीआयनं यावेळी ‘सेफ गेम’ खेळला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाच्या मेन्यूमध्ये बीफ नसेल. बीसीसीआयनं तशी शिफारस ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाकडे केली आहे.

टीम इंडिया या महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात तीन टी-२० सामने, चार कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने होतील. या दौऱ्यापूर्वी खेळाडूंचा प्रवास, सराव आणि खानपानसंबंधी व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी बीसीसीआयचं पथक ऑस्ट्रेलियात गेलं. खेळाडूंसाठी असलेल्या मेन्यूमध्ये शाकाहारी पदार्थांचा समावेश असावा, अशी शिफारस पथकानं ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाकडे केली आहे.

ऑस्ट्रेलियात मिळणाऱ्या जेवणाबाबत खेळाडूंनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत. शाकाहारी खेळाडूंना अधिक त्रास होतो. त्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियातील एका भारतीय रेस्तराँच्या व्यवस्थापनाशी बोलणं झालं आहे, असं बीसीसीआयच्या पथकातील सूत्रांनी मुंबई मिररला सांगितलं.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply