News

टी-२०ः श्रीलंकेला पात्रता सिद्ध करावी लागणार

16Views

दुबईः टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत घसरण झाल्यामुळे २०२० मध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी श्रीलंका आणि बांगलादेश संघांना पात्रता फेरी खेळावी लागणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) विश्वचषकासाठी थेट पात्र ठरलेले ‘सुपर १२’ संघ आज जाहीर केले. आयसीसीनं घोषित केलेल्या संघांमध्ये पाकिस्तान, भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, वेस्ट इंडीज आणि अफगाणिस्तान या संघांचा समावेश आहे. आयसीसीच्या या घोषणेनंतर श्रीलंका आणि बांगलादेश या दोन्ही संघांना विश्वचषकात आपलं स्थान पक्क करण्यासाठी पात्रता फेरी खेळणं आवश्यक आहे. १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०२० या कालावधीत ऑस्ट्रेलियामध्ये पात्रता फेरीचे सामने खेळवले जाणार आहे. टी-२० विश्वचषकावर श्रीलंकेनं एकदा नाव कोरलं असून, ३ वेळा श्रीलंकन संघ उपविजेता राहिला आहे. आयसीसीनं जाहीर केलेल्या संघांमध्ये श्रीलंकेचं नाव नसल्यामुळं क्रिकेटप्रेमी आणि जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आयसीसीच्या पात्रता नियमांप्रमाणे टी-२० च्या आंतरराष्ट्रीय क्रमवारित स्थान मिळवलेल्या पहिल्या आठ संघांना ‘सुपर १२’मध्ये थेट प्रवेश दिला जातो. २०१४ मध्ये विश्वचषकावर नाव कोरलेल्या श्रीलंका संघाला ‘सुपर १२’ मध्ये स्थान न मिळाल्याबाबत श्रीलंकेचा जलदगती गोलंदाज लसिथ मलिंगा यानं नाराजी व्यक्त करत श्रीलंका संघ पात्रता फेरी सहज पूर्ण करून विश्वचषकात आपलं स्थान पक्क करेल, असा विश्वास त्यानं व्यक्त केला आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply