News

ठाकरे पितापुत्रांपाठोपाठ संजय राऊत तिसऱ्या क्रमांकाचे नेते

26Views

मुंबई :-

शिवसेनेला सातत्याने चर्चेत ठेवणारे सध्याचे महत्त्वाचे नेते म्हणजे संजय राऊत. सत्तेत राहून भाजपला नावे ठेवणे, अयोध्यावारीची संकल्पना शोधणे अशा वेगवेगळ्या कामांमुळे चर्चेत असलेल्या संजय राऊतांचे सध्याचे स्थान ठाकरे पिता-पुत्रांपाठोपाठचा तिसऱ्या क्रमांकाचा नेता असे झाले आहे.

आज या लौकीकास भर टाकत त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील चित्रपटाच्या प्रदर्शनाने ते स्थान अधिकच बळकट केले आहे. ठाकरेंसंदर्भातल्या मुस्लीमविरोधी तसेच दक्षिणात्यांविरोधातील विधान सिनेमातून काढणार नाही, असे सेन्सॉरला आव्हान देत त्यांनी पुन्हा एकदा आक्रमक चेहरा समोर आणला आहे. शिवसेना विधीमंडळातील सर्व नेते, सर्व मंत्री संजय राऊत यांच्या या सामर्थ्याकडे हतबल होऊन पहात असल्याचे समजते.

संजय राऊत यांना लढण्यास एकही मतदारसंघ तयार करता आलेला नाही. मात्र त्यांनी स्वतःचे महत्त्व अत्यंत उत्तम रितीने वाढविले असल्याने ते एक शक्तीकेंद्र झाले असल्याची प्रतिक्रिया एका ज्येष्ठ मंत्र्यांने दिली. भाजपला सतत केलेल्या विरोधामुळे सेन्सॉरचा मुद्दा आता सत्ताधारी पक्ष अप्रत्यक्षरित्या लावून धरणार आणि कट मान्य केले नाही तर वाढविणार काय याकडे सेनेचे लक्ष लागले आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply