Uncategorized

तान्हा पोळा रामटेक येथे उत्साहात साजरा.

37Views

रामटेक :-

रामटेक शहरात सर्वत्र आज तान्हा पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वत्र तान्हा पोळ्याची धूम होती.बालगोपाल आपले लाकडी बैल घेऊन चौकाचौकात असलेल्या तोरणांमध्ये सजून-धजून आले होते.त्या ठिकाणी त्यांना विविध पारितोषिके देण्यात आली रामटेक च्या शास्त्री चौक येथे पोळ्याचा उत्सव दरवर्षीप्रमाणे उत्साहात साजरा झाला. यावेळी महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ अध्यक्ष व माजी आमदार एडवोकेट आशीष जयस्वाल,नगराध्यक्ष दिलीप देशमुख,तहसीलदार धर्मेश फुसाटे, नगरसेवक संजय बिसमोगरे, चंद्रशेखर माकडे ,रमेश पिपरोदे, डाॅ. समरीत, खुशाल खोडे, राहूल गुंडरे, प्रशात जैन, महेश लाटकर स्वप्निल खोडे, जयेश कनोजे, विजय रेवतकर आदी हजर होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते बालगोपाळांना पारितोषिके देण्यात आली.

Mehul Rahangdale
the authorMehul Rahangdale
Editor

Leave a Reply