News

तापसी पन्नू आणि अनुराग कश्यपची हॅटट्रिक!

4Views
मुंबई: –
बॉलिवूडची ‘पिंक गर्ल’ तापसी पन्नूआणि दिग्दर्शक अनुराग कश्यपतिसऱ्यांदा एकत्र काम करणार आहेत. तापसी लवकरच दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या नव्या सिनेमात झळकणार आहे.

अनुराग कश्यपच्या ‘मनमर्जिया’ सिनेमात तापसीनं मुख्य भूमिका साकारली होती, अनुरागच्या आगामी ‘सांड की आंख’ चित्रपटातही ती झळकणार आहे. शिवाय, अनुरागनच्या पुढच्या चित्रपटातही महत्त्वाच्या भूमिकेत ती दिसणार आहे. याबाबत बोलताना अनुराग म्हणाला, ‘तापसी मला नेहमीच मला काहीतरी नवं करण्याची प्रेरणा देत असते. मी यापूर्वी कधीच भयपटावर काम केले नव्हते. पण आता मी चित्रपटाच्या कथेवर काम करायला सुरुवात केली आहे.’

अनुरागचा हा आगामी सिनेमा भयपट असल्याचं कळतंय. चित्रपटाचं नाव अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. अनुराग आणि तापसीच्या जोडीचा हा ‘हॅटट्रिक’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर काय कमाल दाखवतो हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं असेल.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply