nagpurruralNews

तालुका स्तरीय क्रीडा सांस्कृतिक स्पर्धेचे शुभारंभ

15Views

सावनेर:-

प्रतिनिधी:-साहिल ढवळे 

सावनेर स्थानिक जवाहरलाल नेहरू विद्यालया च्या पटांगणावर जिल्हा परिषद नागपूर च्या मार्गदर्शनास तालुका स्तरीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले; कार्यक्रमाचे उदघाटक क्षेत्राचे आमदार सुनीलबाबू केदार प्रमुख उपस्थित कांता बाई बागडे(सभापती पंचायत समिती सावनेर) आशिष उपासे (उपसभापती पंचायत समिती सावनेर)
सामाजिक कार्यकर्ते सतीश लेकुरवाळे, नगरसेवक सुनील चाफेकर,निलेश पटे, दिपक बसवार, मुख्यध्यापक किरण पांडव आदी मान्य वरांची प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला..
या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करत क्षेत्राचे आमदार यांनी म्हटले की जि. परिषद शाळा,शिक्षक व विध्यार्थी यांच्यात खूप प्रतिभा असून त्यांना पुढे आणण्याचे कार्य अश्या स्पर्धा मधूनच पुढे आणल्या जाऊ शकतात तसेच सर्व शिक्षकांना विनंती आहे की त्यांनी आपल्या विध्यार्थ्यांना सर्व विषया सोबतच आपला इतिहास आवश्य शिकवला पाहिजे इतिहासाची कास धरून म्हणजेच आपल्याला आपल्या आईने किती वेळा कडेवर घेतले, किती वेळा हाथ धरून चालविले,किरती वेळा आपल्याला घास भरला हे प्रत्येक विद्यार्थ्यांना रुजवणे काळाची गरज झली आहे जो वर त्यांना हा पारिवारिक इतिहास समझणार नाही तो वर त्यांत पारिवारिक व सामाजिक बांधिलकीची उणीव भरून राहील असे माझे मत आहे सावित्रीबाई फुले,महात्माफुले,छत्रपती शाहु महाराज,बाबासाहेब आंबेडकर,शिवाजी महाराज या थोर पुरुषाचे आदर्श पुढे ठेवून समाजाला नविन दिशा देण्याचे कार्य हे विद्यार्थी नक्कीच करणार असा विश्वास व्यक्त करुण शिक्षकांच्या परिश्रमाने विद्यार्थी घडवितात या खेळ संस्कृती व आयोजनातून राज्य स्तरीय खेळाडू नक्कीच निर्माण होतील असा विश्वास व्यक्त केला…
तसेच या प्रसंगी जी. प.शिक्षकांचे जितके कौतुक केले तितके कमी पडणार जि.प. शिक्षक ही आपल्या विद्यार्थ्यां सोबत आजच्या सामाजिक जवलंत विषयावर संस्कृतिक नृत्य,भारुड,वादविवाद स्पर्धा सारखे आयोजनात पुढाकार घेऊन सामाजिक विषय हाताळतात हे खूप मोठी बाब आहे;असे मनोगत व्यक्त करत स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडू चे व तसेच शिक्षक वृंदानि अभिनंदन केले……
सदर आयोजनात पार पडलेल्या कबड्डी,खो खो,आट्या पाट्या,व्हाँलीबाँल,दौड स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धेत गायन,वादन नु्त्य,सामुहिक न्यु्त्य आदीत तालुक्यातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी भाग घेऊण आपल्या खेळाचे कौशल्य सादर केले…

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply