News

तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; ५ जवान शहीद.

10Views

श्रीनगर: –

जम्मू-काश्मीरमधील हंदवाडा येथील बाबगुंड परिसरात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमधील चकमक तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. यात आतापर्यंत पाच जवान शहीद झाले आहेत. तर एक नागरिक ठार झाला आहे.

सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारपासून चकमक सुरू आहे. यात आतापर्यंत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) तीन आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलाचे दोन जवान शहीद झाले आहेत, असं वृत्त ‘एएनआय’नं दिलं आहे. परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली आहे. याच दरम्यान अनेकदा दोन्ही बाजूकडून गोळीबार झाल्याचे सांगण्यात येत आहे. इमारतीत लपून बसलेल्या दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलाच्या जवानांवर बेछुट गोळीबार करण्यात येत आहे. यात नऊ जवान जखमी झाले आहेत, अशी माहिती आहे. दरम्यान, या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply