Uncategorized

तेलंगणात टीआरएस नेत्याची दगडाने ठेचून हत्या

30Views

हैदराबाद:-

तेलंगणामध्ये राजकीय वादातून टीआरएसचे नेते नारायण रेड्डी यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या हत्येनंतर रेड्डी समर्थक संतापले असून त्यांनी जोरदार आंदोलन करत काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांना प्रचंड चोप दिला आहे. काँग्रेसच्या या दोन्ही कार्यकर्त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात आलं.

रविवारी नारायण रेड्डी ग्रुप आणि त्यांच्य विरोधकांमध्ये प्रचंड वाद होऊन हाणामारी झाली होती. त्यानंतर रेड्डी यांची हत्या करण्यात आली. आज सकाळी विकराबाद जिल्ह्यातील सुल्तानपूर गावात त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे रेड्डी समर्थक रस्त्यावर उतरल्याने गावात तणाव वाढला आहे. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मात्र काँग्रेस आणि टीआरएस कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याने या गावात प्रचंड प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply