News

‘त्याने’ धैर्याने तोंड दिेले पाकच्या छळाला.

36Views

पाकिस्तान: –

पाकिस्तानी सैनिकांनी जबर मारहाण केली, हात बांधून ,डोळ्यावर पट्टी बांधून व्हिडिओमध्ये बोलायला भाग पाडले. प्रचंड मानसिक छळ केला. पण या सगळ्या भयानक वागणुकीचा अभिनंदनवर अजिबात परिणाम झाला नाही. अत्यंत धैर्याचा आणि ऑफिसरच्या शालीनतेचा परिचय अभिनंदन याने दिला आहे.

भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राइक केल्यानंतर बुधवारी सकाळी पाकिस्तानी विमानं भारताच्या हद्दीत घुसून आली. या विमानांना भारतीय हवाई दलाने चोख प्रत्युत्तर दिले. पण या दरम्यान दोन भारतीय मिग -२१ त्यांचा पाठलाग करत पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेली. त्यातील एक विमान भारतीय सीमेत कोसळलं तर दुसरं विमान पाक व्याप्त काश्मीरमध्ये कोसळलं. दुसऱ्या विमानातील पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्तमानला पाकिस्तानी सैनिकांनी पकडले. अभिनंदनला पाकिस्तानने ताब्यात घेतल्यानंतर त्याचे तीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. हे व्हिडिओ जीओ टीव्ही या पाकिस्तानातील बातम्यांच्या वाहिनीने ही प्रसारित केले. विंग कमांडर अभिनंदन याला ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्याला एका झऱ्याच्या काठी पाकिस्तानी सैनिक मारहाण करत आहेत असा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. हा व्हिडिओ पाकिस्तानी जनतेला खुश करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आला.

त्यानंतर प्रदर्शित करण्यात आलेल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्याचे हात पाठीमागे बांधले होते. त्याचा चेहरा रक्तबंबाळ झाला होता. मारून मारून त्याचे नाकही फोडले गेले होते. या व्हिडिओत तो त्याचं नाव आणि धर्म हिंदू असल्याचं सांगत होता. या व्हिडिओवर भारतातून भरपूर टीका करण्यात आली तर पाकिस्तानात या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया देण्यात आल्या. भारतीय नेत्यांनी यावर टीका केली. तसंच भारत याविरोधात संयुक्त राष्ट्रसंघात जाऊ शकतो असा इशाराही भारताने दिला. त्यानंतर पाकिस्तान हे एक सन्मानीय राष्ट्र असून युद्धकैद्यांना अत्यंत चांगली वागणूक देतो हे दाखवण्यासाठी अभिनंदनचा अजून एक व्हिडिओ जाहीर करण्यात आला. या व्हिडिओत अभिनंदन एका मेजरशी बोलत होता. त्याचप्रमाणे त्याच्या हातात एक चहाचा कपही होता. त्याच्याशी अत्यंत सन्मानाने पाकिस्तानी ऑफिसर वागत होता. त्याला कशी वागणूक दिली जाते आहे हे विचारण्यात आलं.तसंच चहा कसा आहे हेही विचारण्यात आलं .तो कुठला आहे, त्याचं मिशन याबद्दल त्याला प्रश्न विचारले असता त्याने उत्तर देण्यास नकार दिला.

तिन्ही व्हिडिओमधून अभिनंदन परिस्थितीला अत्यंत धैर्याने तोंड देत आहे हे स्पष्ट झालं आहे. त्याबद्दल संपूर्ण देशभर त्याचं कौतुक केलं जातं आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply