News

त्रिपुराच्या राज्यपालांनी केली ‘ही’ चूक.

60Views

आगरतळा

दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीयांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी देशात प्रार्थना सुरू आहेत. तर, दुसरीकडे त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांनी वाजपेयींना ट्विटरवर श्रद्धांजली वाहली असल्याचा प्रकार समोर आला. चूक लक्षात आल्यानंतर ट्विट डिलीट करण्यात आले.

भारताचे माजी पंतप्रधान, उत्कृष्ट वक्ता आणि सहा दशके देशाच्या राजकारणावर छाप सोडणारे, विनम्र अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाले असे आशयाचे ट्विट त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांनी केले.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply