News

दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग लवकरच एक जबरदस्त टीव्ही लाँच करण्याच्या तयारीत आहे.

10Views

नवी दिल्ली :-

दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगलवकरच एक जबरदस्त टीव्ही लाँच करण्याच्या तयारीत आहे. सॅमसंगने ओएलईडी टीव्हीपासून मायक्रो ओएलईडी टीव्हीपर्यंत एकापेक्षा एक जबरदस्त टीव्ही बाजारात उतरवल्या आहेत. आता लवकरच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा नमूना म्हणजे वायरलेस टीव्ही बाजारात उतरवण्याचे सॅमसंग कंपनीने ठरवले आहे.

सॅमसंगच्या या टीव्हीत एकही वायर नसणार आहे. इतकच काय तर पॉवर सप्लाय करण्याचीही या टीव्हीला गरज पडणार नाही. सॅमसंगने आपल्या वायरलेस टीव्हीच्या संकल्पनेवर काम करणे सुरू केले आहे. जर स्मार्टफोन पूर्णपणे वायरलेस असू शकतो तर टीव्ही का असू शकणार नाही?, असे म्हणत कंपनी लवकरच वायरलेस टीव्ही बाजारात उतरवणार आहे. सॅमसंग टीव्हीच्या वायरच्या जागी ट्रांसीवर रिप्लेस केले जाईल. टीव्हीत फोन बॅटरीप्रमाणे सॅमसंग एक रिचार्जेबल पॉवर बारचा वापर करणार आहे. हा बार टीव्हीला करंट देण्याचे काम करेल. या पॉवर बारला टीव्हीच्या रियरमध्ये प्लेस केले जाईल.

हा पॉवर बार फोनच्या बॅटरीच्या तुलनेत खूप पॉवरफूल असेल. टीव्हीला स्मार्टफोनसारखे रिचार्ज करता येईल. सॅमसंग वायरलेस टीव्हीत वापरण्यात येणारे पॉवर बार हे टीव्हीच्या स्पीकर्समध्ये बसवण्यात येतील. पॉवर बारच्या दोन्ही बाजुला दोन स्पीकर सेटअप दिला जाईल. पॉवर बारला टीव्हीला अटॅच करण्याची गरज उरणार नाही. सॅमसंगने वायरलेस टीव्हीचे आता केवळ पेटेंट केले आहे. हा टीव्ही कधीपर्यंत लाँच करेल, यासंबंधी सॅमसंगने अद्याप काहीही सांगितले नाही.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply