News

दहशतवादाला आश्रय देणाऱ्यांवर कारवाई गरजेची: सुषमा स्वराज.

41Views
अबूधाबी :-

 संपूर्ण जग दहशतवादाने त्रस्त झाले असून दहशतवादाला संरक्षण आणि आश्रय देणाऱ्यांविरोधात कारवाई झाली पाहिजे, तसेच त्यांना होत असलेला वित्तपुरवठाही रोखला पाहिजे असे ठाम प्रतिपादन करत भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराजयांनी भारताची बाजू इस्लामिक राष्ट्रांपुढे मांडली. त्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशनच्या (ओआयसी) परिषेदत बोलत होत्या. दहशतवाद हा ‘धर्मातील विकृती’ आणि ‘श्रद्धेची दिशाभूल’ अशा कारणांमुळे निर्माण होतो असेही त्या म्हणाल्या. स्वराज यांना ओआयसीने ‘गेस्ट ऑफ ऑनर’ म्हणून आमंत्रित केले आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी या परिषदेकडे पाठ फिरवली आहे.

दहशतवादाविरोधातील भारताची भूमिका परिषदेत मांडताना सुषमा स्वराज पुढे म्हणाल्या की, भारताने दहशतवादाविरुद्ध सुरू केलेली लढाई कोणत्या धर्माविरुद्ध नाही, अल्लाहचा अर्थ शांती असा आहे, इस्लाम शांतीची शिकवण देतो. अल्लाहच्या एकूण ९९ नावांपैकी कोणत्याही नावाचा अर्थ हिंसा असा होत नाही. त्याच प्रमाणे जगातील कोणताही धर्म हा शांतीसाठीच आहे.

जगभरातील संस्कृतींचा मेळ होणे गरजेचे आहे. भारत नेहमीच मानवी मूल्यांना महत्त्व देत काम करत आला आहे. भारतात प्रत्येक धर्म आणि संस्कृतींचा सन्मान केला जातो, असे म्हणत आपण महात्मा गांधी यांच्या देशातून आल्याचेही स्वराज यांनी आवर्जून सांगितले.

दिवसेंदिवस जगात दहशतवादाचा आवाक वाढत असल्याचे दिसत आहे. आज जगभरात दहशतवाद एका वेगळ्याच स्तरावर पोहोचल्याचे दिसत आहे. दहशतवादाला संरक्षण आणि आश्रय देण्यावर म्हणूनच बंदी घातली गेली पाहिजे, असे म्हणत दहशतवादाच्या मुद्द्यावर जोर देत स्वराज सर्व इस्लामी देशांचे लक्ष वेधले.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply