News

देशभरात २५ कोटी जनधन खाते व्यवहारात

16Views

नवी दिल्ली:-

सहा कोटी ग्रामीण आणि दीड कोटी शहरी कुटुंबापर्यंत पोहचण्याचे लक्ष्य साध्य केल्यानंतर जनधन योजनेतंर्गत देशभरात ३३.५ कोटी जनधन खाती उघडण्यात आली आहेत. त्यापैकी २५.६ कोटी खाती सक्रिय असल्याची माहिती केंद्र सरकारने संसदेला दिली. या खात्यांमध्ये ८५ हजार ४९४ कोटी रुपये आहेत. भाजप खासदार वरुण गांधी आणि अॅंग्लो इंडियन सदस्य जॉर्ज बेकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्र सरकारने सांगितले की, डिसेंबर २०१२ पर्यंत १९.६ कोटी ग्रामीण-निम्न शहरी भागातील आणि १३.६ कोटी शहरी खातेधारक आहेत. उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक ५.२ कोटी जनधन खाती असून या खात्यांमध्ये १४ हजार ८८२ कोटी रुपये आहेत. पश्चिम बंगाल ११ हजार ४७० कोटी रुपये आहेत. बिहारमध्ये ८४१७ कोटी, राजस्थानमध्ये ६३६० कोटी, महाराष्ट्रात ५०३५ आणि मध्यप्रदेशमध्ये ४३२५ कोटी रुपये जनधन खात्यांमध्ये जमा आहेत.

सरकारच्यावतीने आतापर्यंत २६ कोटी रुपे कार्ड देण्यात आले आहे. यामध्ये ओव्हरड्राफ्टच्या सुविधेसह मायक्रो युनिटसाठी क्रेडिट गॅरंटी देण्यात आली आहे. ज्या खात्यांमध्ये दोन वर्षात एक वेळा तरी व्यवहार झाला असला तरी असे बँक खाते सक्रीय असल्याचे गृहित धरण्यात येते. जवळपास ७६ टक्के जनधन खाती सक्रिय आहेत.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply