News

धोनीच्या दहा हजार वनडे धावा

22Views

सिडनीः-

आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा पल्ला गाठणारा धोनी हा भारताचा पाचवा फलंदाज ठरला आहे. धोनी खेळपट्टीवर आला तेव्हा त्याच्या ९९९९ वनडे धावा होत्या. एक धाव घेत दहा हजार वनडे धावा करणाऱ्यांच्या यादीत येण्यासाठी धोनीला सात चेंडू लागले. धोनीने शनिवारी ५१ धावांची खेळी केली.

खरेतर वनडेमध्ये दहा हजार धावांचा पल्ला धोनीने गेल्यावर्षीच गाठला होता; पण त्या धावांमध्ये आशिया संघांचे प्रतिनिधित्व करताना झालेल्या धावांचा समावेश होता. फक्त भारताचे वनडेत प्रतिनिधित्व करताना दहा हजार धावांचा पल्ला त्याने शनिवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी वनडेत पार केला.

भारताकडून याआधी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविज आणि विराट कोहली यांनी दहा हजार वनडे धावांचा पल्ला पार केला आहे. तर क्रिकेट इतिहासात आंतरराष्ट्रीय वनडेमध्ये दहा हजार धावा करणाऱ्यांमध्ये धोनी हा तेरावा फलंदाज ठरला आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply