News

धोनीच्या नावे ‘असाही’ विक्रम.

46Views

नवी दिल्ली: –

न्यूझीलंडच्या विरोधात सध्या सुरू असलेल्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा दारूण पराभव झाल्यामुळं माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. हा विक्रम आहे, सर्वाधिक धावा करूनही सामना गमावण्याचा. धोनीनं सर्वाधिक धावा केल्यानंतरही टी-२० सामना गमावण्याची भारताची ही पाचवी वेळ आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात धोनीने ३९ चेंडूंमध्ये ३१ धावा केल्या. इतक्या धावा इतर कोणत्याही फलंदाजाला करता आल्या नाहीत. या सामन्यात भारताचा तब्बल ८० धावांनी पराभव झाला. याआधी धोनीने सर्वाधिक धावा केलेल्या चारही सामन्यांत भारताला पराभव पत्करावा लागला आहे. त्यात आता आणखी एकाची भर पडली आहे.

२०१२मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात धोनीने सर्वाधिक ४८ धावा केल्या होत्या. पण या सामन्यात भारताचा पराभव झाला. त्याचवर्षी इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात धोनीने भारताकडून सर्वाधिक ३८ धावा केल्या होत्या. मात्र, तोही सामना भारताना गमावला होता. २०१६मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळलेल्या सामन्यात धोनीने ३०, तर २०१७मध्ये इंग्लंडरुद्धच्या सामन्यात ३६ धावा केल्या होत्या. मात्र, हे दोन्ही सामने भारताला जिंकता आले नव्हते. बुधवारीही त्याची पुनरावृत्ती झाली. त्यामुळं ज्या सामन्यात धोनी सर्वाधिक धावा करतो, त्यात भारत हरतो असं समीकरणच बनल्याची चर्चा आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply