EntertainmentNews

नंदकिशोर चौघुले कोणाच्या टीममध्ये ?

67Views

बिग बॉसच्या घरात नंदकिशोर चौघुलेयांची दमदार एन्ट्री तर झाली. पण बिग बॉसच्या घरातील आपल्या या पुढील प्रवासात नंदकिशोर चौघुले कोणाला समर्थन देणार याबद्दल आता उत्सुकता निर्माण झाली आहे.

बिग बॉसच्या घरातील सदस्यांची सध्या दोन गटात विभागणी झाली आहे. एकीकडे मेघा धाडे, सई लोकुर, पुष्कर जोग, उषा नाडकर्णी, शर्मिष्ठा राऊत, त्यागराज खाडिलकर अशी टीम बनली आहे. तर दुसरीकडे रेशम टिपणीस, सुशांत शेलार, भूषण कडू, स्मिता गोंदकर, जुई गडकरी आणि आस्ताद काळे यांची टीम बनली आहे. काही दिवसांपूर्वीच घरात वाईल्ड कार्ड एन्ट्रीने दाखल झालेले स्पर्धक शर्मिष्ठा राऊत व त्यागराज खाडिलकर यांनी मेघाच्या टीमला आपले समर्थन दिले. त्यामुळे नेहमीच आपल्या टीममध्ये कमी सदस्य आहेत, म्हणून रडणाऱ्या सई व मेघाला दिलासा मिळाला आहे.

नंदकिशोर चौघुले यांचे घरात स्वागत तर झाले असेल तरी ते कोणत्या गटात सहभागी होणार की ‘एकला चलो रे’ म्हणत बिग बॉसच्या खेळात आपला वेगळाच डाव मांडणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply