nagpurruralNewsUncategorized

नरखेड येथे शेर शिवाजी संघटनेचे बेमुदत ठिय्या आंदोलनाला प्रारंभ.

नरखेड तालुक्यात तीव्र दुष्काळ जाहीर करण्याची मागणी # मुख्यमंत्री व पालकमंत्यांना दिले स्मरणपत्र

38Views

नरखेड:-

प्रतिनिधी/१५ योगेश चौरे
नरखेड तालुक्याचा समावेश तीव्र दुष्काळ यादीत न केल्यामुळे शेर शिवाजी संघटनेकडून तहसील कार्यालय समोर,नरखेड येथे बेमुदत ठिय्या आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला.आणि तहसिलदार नरखेड यांच्यामार्फत मुख्यमंत्री व पालकमंत्री यांना स्मरणपत्र देण्यात आले. महाराष्ट्र शासनाने दुष्काळग्रस्त तालुक्याची यादी जाहीर केली. यामध्ये नरखेड तालुक्याचा समावेश हा मध्यम स्वरूपाच्या दुष्काळ ग्रस्त तालुक्याच्या यादीत केला. वास्तविक परिस्थिती पाहता नरखेड तालुक्यामध्ये भयावह दुष्काळाची परिस्थिती आहे. आणि नरखेड तालुक्याचा समावेश हा मध्यम स्वरूपाच्या दुष्काळग्रस्तांची यादीत करणे ही बाब अन्यायकारक असून नरखेड तालुक्यात तीव्र दुष्काळ जाहीर करा ही बाब लक्षात आणून देण्यासाठी शेर शिवाजी संघटनेतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उपविभागीय अधिकारी,काटोल यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले या निवेदनावर काही कार्यवाही न झाल्यामुळे निवेदनात दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे आंदोलन केले आहे. आंदोलनाची दखल घेऊन नरखेड तालुक्याचा समावेश तीव्र दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत लवकरात लवकर करावा अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याची माहिती शेर शिवाजी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सागर राऊत यांनी दिली. या आंदोलनाला नरखेड तालुक्यातील शेर शिवाजी संघटनेचे कार्यकर्ते शेतकरी व शेतकरी पुत्रांनी मोठ्या संख्येने प्रमाणात उपस्थित होते.
आंदोलन कर्त्यांच्या प्रमुख मागण्या
नरखेड तालुक्याचा समावेश हा तीव्र दुष्काळ ग्रस्त तालुक्याच्या यादीत करा.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दुष्काळाची आर्थिक मदत लवकरात लवकर देण्यात यावी..
बँकांना शेतकऱ्याला तातडीने कर्ज देण्याचे निर्देश दयावे. शेतकऱ्याचे शेतातील मोटार पंपाचे विज बिल माफ करावे.
शेतात पाणी ओलतासाठी कमीत कमी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत विद्युत पुरवठा करण्यात यावा इत्यादी मागण्या केलेल्या आहे.यावेळी शेर शिवाजी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सागर राऊत यांच्या नेतृत्वात, शेकडो शेतकरी पुत्र यांनी आंदोलनात सहभाग घेतला.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply