News

नवीन वर्षामध्ये वेतनवाढीची भेट

9Views

पंचवटी :-

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना डिसेंबर २०१८ पासून पदोन्नती आणि वेतनवाढ करण्याचा निर्णय सभापती शिवाजी चुंभळे व संचालकांनी सोमवारी (दि. ३१) घेतला. या निर्णयाने २००३ नंतर पहिल्यांदाच अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदोन्नती झाली आहे.

नाशिक बाजार समितीत ११९ कर्मचारी असून त्यातील नियमित असलेल्या ६१ जणांना पदोन्नती देण्यात आलेली आहे. तर ३२ कर्मचारी कालबद्ध म्हणजे १२ वर्षे सेवा पूर्ण केलेले आहेत. तसेच ९३ अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचा फायदा होणार आहे. यात कमीत कमी १ हजार ८२२ ते जास्तीत जास्त १४ हजार ९६० रुपयांपर्यंतची वेतनवाढ झालेली आहे. या पदोन्नती आणि वेतनवाढीमुळे बाजार समितीवर दरमहा सुमारे ५ लाख रुपयांचा बोजा पडणार आहे. नवीन भरती झालेले तसेच शिपाई पदावर काम करणारे ज्यांची शैक्षणिक पात्रता नाही अशा २६ कर्मचाऱ्यांना या वेतनवाढीचा फायदा मिळणार नाही.

पदोन्नती आणि वेतनवाढ मिळाल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संचालक मंडळाचे आभार मानले. बाजार समितीच्या कामकाजात सुसूत्रता आणून बाजार समितीचे उत्पन्न वाढीसाठी व विकासासाठी भर टाकण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले. याप्रसंगी उपसभापती युवराज कोठुळे, संचालक चंद्रकांत निकम, रवींद्र भोये, भाऊसाहेब खांडबहाले, जगदीश अपसुंदे, विमल जुंद्रे, संपत सकाळे आदी उपस्थित होते.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply