News

नांदगाव खंडेश्वर येथील तहसील कार्यालयात महसूल दिनाचा कार्यक्रम संपन्न.

158Views

नांदगाव खंडेश्वर/ उत्तम ब्राह्मणवाडे

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा केला सन्मान
तहसीलदार मनोज लोणारकर यांचा उपक्रम
नांदगाव खंडेश्वर येथील तहसील कार्यालयात महसूल दिनाचा कार्यक्रम तहसीलदार मनोज लोणारकर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी गेल्या एक वर्षात तहसील कार्यालयातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी, मंडल अधिकारी,तलाठी,कोतवाल, शिपाई,मतदार यादी चे काम करणारे बी. एल.ओ. रास्त भाव धान्य दुकानदार यांचा प्रशस्तीपत्र देऊन तहसीलदार मनोज लोणारकर यांनी सन्मान केला यावेळी उत्कृष्ट कार्य करणारे कर्मचारी गौरव लोखंडे विलास धनवे (कनिष्ठ लिपिक) मंगेश मार्कंड (मंडल अधिकारी) वसंत जाधव (तलाठी येणंस) मोहोड ( तलाठी फुल आमला) सौ चर्हाटे (बीएलओ) निरंजन मनोहरे (शिपाई) संतोष पवार (कोतवाल धानोरा -गुरव) व्ही.बी. कडू व ताई सु वनवे ( रास्त भाव दुकानदार) यांचा सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून (निवासी नायब तहसीलदार) चेतन मोरे तसेच( नायब तहसीलदार) एे.आर.हाडोळे उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन संजय सूर्यवंशी ( तलाठी) प्रास्ताविक चेतन मोरे तर आभार प्रदर्शन पुरवठा निरीक्षक गजानन भेंडेकर यांनी केले या कार्यक्रमाला संदीप सोनकुसरे, अशोक पारधी,अरुण जंगले,सुमित ढवळे, सुभाष राठोड, मंगेश गावनेर,पी.पी.ढवळे, एस बी राऊत,आर जी धवणे,एम आर चव्हाण, एस जी खडसे, विवेक महाजन, पत्रकार उत्तम ब्राह्मणवाडे, तलाठी बाळासाहेब पिंजरकर, संदीप बागडे, मिश्रा, गावंडे यांचे सह कार्यालयातील सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते

Mehul Rahangdale
the authorMehul Rahangdale
Editor

Leave a Reply