nagpurruralNews

नांदगाव खंडेश्वर येथे भव्य अशा रक्तदान शिबिराचा शुभारंभ.

१११ रक्तदात्यांनी केले विक्रमी रक्तदान जिल्हा सामान्य रुग्णालय व द पावर ऑफ मिडियाचा संयुक्त उपक्रम

68Views

नांदगाव खंडेश्वर:-

प्रतिनिधी:-उत्तम ब्राह्मण वाडे
जम्मु कश्मीर मधील पुलवामा येथे झालेल्याअतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय लश्कराच्या जवानांना श्रध्दांजली देण्याच्या मुख्य उद्देशाने अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयांचे शल्य चिकीत्सक डॉ.शामसुंदर निकम यांनी प्रत्येक महीन्याच्या 14 तारखेला जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. त्याला पाठींबा देत द पॉवर ऑफ मिडीया या पत्रकार संघटनेच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्याचे ठरविले आहे. या रक्तदान शिबिराचा आज शुभारंभ डॉ पंजाबराव देशमुख यांच्या जन्मतालुका असलेल्या नांदगाव खंडेश्वर येथील ग्रामिण रुग्णालयामध्ये 111 रक्तदात्यांनी विक्रमी रक्तदान करुन अनोखी श्रद्धांजली शहीदांना वाहीली. या कार्यक्रमाचे आयोजन द पॉवर ऑफ मिडीया नांदगाव खंडेश्वर शाखेने केले होते. या शिबिरामध्ये संघर्ष युवा संघटन, भारतीय जैन संघटना, आय.टी.आय काँलेज, विनायक विज्ञान महाविद्यालय तसेच कला महाविद्यालय यांनी सहभाग घेतला होता. या शिबिराचे उद्घाटन तहसिलदार एम.एम. जोरवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी विनोद खेडकर हे होते. प्रमुख अतिथी म्हणुन महाराष्ट्र सरपंच सेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष पुरुषोत्तम घोंगरे (पाटील), नगर पंचायतच्या अधिकारी सौ.सोनालीताई यादव, ग्रामिण रुग्णालयच्या अधिक्षीका सौ.प्रविणाताई देशमुख, ठाणेदार मगनजी मेहते, सौ शोभा लोखंडे, राहुल उके, राज्य संघटक संदिप बाजड, उत्तम ब्राम्हणवाडे, सुभाष कोटेजा,पवन काकडे,जिल्हाध्यक्ष उमेश लोटे, सतिष वानखडे, रक्तदान अधिकारी उमेश आगरकर, सुरेंद्र आकोडे, छगन जाधव, आशिष गवई, मनोहर शिरकरे, डॉ मंगेश पचगाडे यांची उपस्थिती होती. सुरुवातीला शहीद पंजाब उईके आणि सर्व शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करुन रक्तदानाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन वकील दानिश, प्रास्ताविक उमेश लोटे, आभार नितिन जाधव यांनी मानले. या कार्यक्रमाला शहरातील प्रतिष्ठीत नागरिक व युवकांची उपस्थीती मोठ्या प्रमाणात होती. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता विनेश बेलसरे, निकेत ठाकरे, सागर सव्वालाखे, राजेश ठाकरे, अमोल दांडगे, प्रशांत झोपाटे, अरुण बनकर, गजानन भस्मे, नितीन जाधव, गणे्श माटोडे, श्रीकष्ण शिरबहादुरकर, जितेंद्र आखरे, उमेश चौकडे, अथहर खान, अनिकेत शिरभाते, अंकुश निमनेकर, योगेश राऊत, विजय नाडे, अवधुत गाडेकर, देविदास गाडेकर, अमोल ठाकरे, पवन ठाकरे, रमेश गांजीवाले, शाम बोरकर, अजय पंचगडे, सागर गावनेर, सागर गुप्ता प्रविण मरापे, दिनेश शेळके, आशिष खंडार इत्यादी पत्रकारांनी अथक परिक्षम घेतले.
या कार्यक्रमानंतर ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply