nagpurruralNews

नांद पोलीसांची नाकाबंदी दरम्यानची कार्यवाही.

    ८ लाख ८१ हजारांची देशी विदेशी  दारू जप्त

36Views

 

नांद:-

प्रतिनिधी :राम वाघमारे 

नाकाबंदी दरम्यान मीळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नांद चौकीतील बिट अंमलदार  यांनी आपल्या सहकारी कर्मचा-यांनसह सालेभट्टी (चोर) फाट्याजवळ चारचाकी बुलेरो पिकअप  वाहनाला अडवून या वाहनातून १ लाख ७५ रुपयांची देशी दारू तर विदेशी ६५७० असा एकून ८ लाख ८१ हजार ५७० रूपयांची एकूण मुद्देमालासह जप्त केली . ही कार्यवाही  शनिवारी रात्री  १०:३०  वाजताच्या दरम्यान  केली.

१) सचिन छत्रपती बावणे(२४) , २)गौरव हरीहर दांडेकर  (२०), ३) अक्षय वसंत पाटील( २१) सर्व रा.उमरेड  जिल्हा. नागपूर यांना अटक करून त्यांचेवर मुंबई दारूबंदी कायद्याचे कलम ६५(अ)(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांद पोलीसांना अशी माहीती मीळाली की, उमरेड वरून चिमूर मार्गाने एका पांढ-या रंगाच्या महेन्द्रा  बुलेरो पिकअप  क्रमांक एमएच-४० वाय-७८३० क्रमांकाच्या वाहनाने देशी दारूची वाहतुक उमरेडकडून चिमूरकडे करीत असल्याची माहिती मिळाली. सदर माहीती नांद  पोलीसांनी  लगेचच  चौकीतील बिट अंमलदार राजेंद्र डहाके  यांनी चौकीतील  कर्मचारी यानी रात्री दहा वाजता सालेभट्टी फाट्याजवळ नाकाबंदी  ठेवली त्यादरम्यान गुप्त माहिती मिळाली त्या वर्णनानूसार बुलोरो पिकअप या सालेभट्टी फाट्यावर रात्री १०:३० वाजता दाखल झाली या चौरस्त्यावर वाहनांची सतत ये जा असल्याने व या मार्गावर नेहमीच वाहनांची गर्दी असते. त्यामुळे भिवापूर पोलीस दबा धरून रस्याचे कडेला गाडीतुन चालत होते.या बुलोरो  ला गलेच त्यानी आपल्या पाठीमागे घेतले व सामोर रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे त्यामुळे या मार्गावर एकेरी वाहतुक आहे. याचाच फायदा पोलीसांनी घेतला व या चौरस्तावर बाजूला असलेल्या ट्रक च्या अगदी मधोमध या वाहनाला घेतले या दरम्यान बुलोरो  चालकाला या वाहनाचा कोनताच अंदाज आला नाही व तो व्होवरटेक च्या भानगडीत बुलेरो या पोलीसांचे  वाहनाच्या मागोमाग चालत गेला. व एका उभ्या ट्रक चा आळोशाला घेऊन वाहन थांबवले यातच हि बुलोरो पिकअप चारहीबाजूने फसली त्यातच पोलिसांनी या वाहनाची झळती घेतली.त्यात तिघांना विचारपूस केली व वाहनाची झळती दरम्यान मागील भागात ७० देशी दारूच्या पेट्या व एक पेटी विदेशी दारू आढळून  आल्या या देशी दारूची किंमत १ लाख ८१हजार रूपये व विदेशी दारूची ६५७०रूपये आहे.तर दारूची वाहतुक करणा-या वाहनाची किंमत २७ लाख ५० रूपये आहे.

सदर आरोपी वाहनासह नांद चौकीला आणण्यात आले .दारू व वाहनाचा पोलीसांनी पंचनामा केला.वाहनाच्या मागील डाल्यात  देशी दारूच्या बाटल्या भरुन घेतल्या होत्या. ती सापडलेली दारू चिमूर तालुक्यातील खेडेपाड्यात पोहचविली जाणार होती. ही दारू वाहतुक एका नामवंत दुकानदाराकडून होत होती. चिमूर तालुक्यातील अनेक गावात नेहमीच मध्यरात्रीच्या सुमारास त्याचा पुरवठा केला जातो असे अटकेत असलेल्यानी सांगितले पण  वरील दारू कोणत्या दुकानातून पुरवठा केला जातो ते चौकशीत स्पष्ट होईल.

बंदी असलेल्या चंद्रपुर जिल्यात दारू पोहचवण्यासाठी तस्कर विवीध क्लृप्त्या करीत असून असाच प्रकार या मार्गाने ब-याच वेळी घडला .या दारू तस्करीला अगदी अल्पवयीन मुले देखील दारू माफिया या कामाला लावतात. पैशाचे प्रलोभन देऊन या मुलांना दारू पोहचवण्यासाठी तयार करतात त्यामूळे हे अल्पवयीन मुलांना पकडले जाते पण महत्वाची दारू तस्करी करणारे मात्र मालामाल होते व दारू पोहचविनारे मात्र कार्यवाहीस सामोरे जातात हे विशेष.

या प्रकरणी भिवापूर पोलीसांनी  आरोपीविरूद्ध ६५ (अ)(ई)मुंबई दारूबंदी कायद्यान्वे गुन्हा नोंदवून आरोपीस अटक करण्यात आली सदरची कार्यवाही ठाणेदार संतोष वैरागडे  यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अंमलदार  राजेंद्र डहाके  नागेश वाघाडे, संदेश रामटेके , नरेश बाटबराई,  यांनी यशास्वी पार पाडली.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply