nagpurruralNews

नागसेनवन मैदानात तीन दिवसीय निःशुल्क योगशिबीर.

शारीरीक , मानसिक आरोग्यासाठी योगाचा विशेष फायदा..! आमदार डाँ.मिलिंद माने

96Views

नागपूर :-

प्रतिनीधी:-दिलीप ठाकरे

सकाळच्या थंड वातावरणात विनोबा भावेनगर परिसरातील नागसेनवन मैदानात शुक्रवार १५ मार्चपासून तीन दिवसीय निःशुल्क योगशिबिर आयोजित करण्यात आलेल्या शिबिरामध्ये आयोजक योगयोध्दा विनायक बारापात्रे, उद् घाटक आमदार डॉ.मिलिंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली विविध आसनांची प्रात्यक्षिके आणि माहिती साधकांना देण्यात आली.
शिबिराची सुरुवात दिपप्रज्वलन करुन पाहुण्यांच्या स्वागत समारोहाने करण्यात आली. सर्वप्रथम मानेच्या हालचाली झाल्यानंतर स्कंध संचलन, मेरूदंड संचलन, जानू संचलन तसेच दंडस्थिती, बैठकस्थिती, शयनस्थिती आदि आसनांचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. योगयोध्दा विनायक बारापात्रे यांनी साधकांना मार्गदर्शन करताना प्रत्येक आसन कसे करायचे, आसन करताना कुठली काळजी घ्यायची यांसह आसनांपासून मिळणारे फायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. भारतीय संस्कृतीत योग साधनेला विशेष महत्त्व असून, शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगाचा विशेष फायदा होत असून योग ही साधना आहे, ती आयुष्यभर करावी असा सल्ला आमदार डाँ.माने यांनी दिला.
प्रथम दिवसीय सत्र अमित मिश्रा यांनी घेतले. त्यांनी जनतेला योगा बद्यलसविस्तर माहिती पटवुन दिली. सरते शेवटी हास्यासन सिंहासन व शांतिपाठ घेऊन पहिल्या दिवसाचे सत्र संपविण्यात आले. योग प्रचारक सुर्यकांतभाऊ बारापात्रे यांनी सर्वांचे आभार प्रदान व्यक्त केले. याप्रसंगी प्रकाश काबंळे, गौतम ठाकुर डाँ.गायकवाड, ढोणे,वंदना लोखंडे, गिता बारापात्रे, रेखाअंतुरकर, किरण, रोहिणी, कळसेताई, लता वाकोडे, पुष्पा गुरव, सरला दडवे, दुर्गा गौर अन्य योग साधक व नागरिक उपस्थीत होते.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply