News

पंतप्रधान मोदींची नाराजी राज्यसभा कामकाजावर.

30Views

 नवी दिल्ली:-

विरोधकांच्या उदासीनतेमुळे राज्यसभेच्या अधिवेशनांत फारसे कामकाज न झाल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केली. ‘राष्ट्रीय युवा संसद महोत्सव २०१९’मध्ये बोलताना त्यांनी युवकांनी आपापल्या भागातील खासदारांना प्रश्न विचारण्याचे आवाहन केले.

क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) आणि नेहरू युवा केंद्र संघटनेने भरवलेल्या या महोत्सवात देशभरातील युवकांनी सहभाग घेतला. त्यात बोलताना मोदी यांनी भारतीय जनता पक्षप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारने लोकसभेत ८५ टक्के कामकाज केल्याचे सांगितले. आधीच्या तुलनेत हे प्रमाण २० टक्क्यांनी अधिक असून त्यात २०५ विधेयके मंजूर करण्यात आल्याचेही स्पष्ट केले. लोकसभेत सरकारला बहुमत आहे. मात्र, राज्यसभेत विरोधकांनी सहकार्य न केल्याने केवळ आठ टक्केच उपयुक्त काम झाल्याचे त्यांनी सांगितले.

युवकांनी राज्यसभेतील त्यांच्या त्यांच्या भागातील खासदारांना प्रश्न विचारून कामकाजाची माहिती घ्यावी, त्यातून त्यांच्यावर दबाव येऊन देशाच्या विकासावर सकारात्मक चर्चा होईल, असे मोदी यांनी सांगितले. राजधानीत आलेल्या युवकांनी राष्ट्रीय युद्ध स्मारक आणि राष्ट्रीय पोलिस स्मारकाला अवश्य भेट देऊन त्यापासून प्रेरणा घेण्याचे आवाहनही मोदींनी याप्रसंगी केले.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply