nagpurruralNews

पत्रकार दीन संपन्न.

बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती संपन्न... वरिष्ठ पत्रकारांचा सत्कार...

16Views

सावनेर:-

प्रतिनिधी:-साहिल ढवळे

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने पत्रकार दीन म्हणून संपूर्ण महाराष्ट्र भर साजरा होणारा याआयोजनाचे औचित्य साधुन पत्रकार क्षेत्रात कार्य करुण निवु्त्त झालेले वयोवु्ध्दा पत्रकारांचा सत्कार करण्यात आला…
सावनेर तालुका मराठी पत्रकार संघ सावनेर वदारे आयोजीत सदर आयोजनास राजु रणवीर तहसीलदार सावनेर अध्यक्ष म्हणून तर प्रमुख उपस्थिती सत्कार मुर्ती प्रा.महाविर प्रसाद त्रिवेदी,प्रा.कमल भारव्दाज,नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस योगेश कोरडे,सावनेर तालूका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तेजसिंग सावजी यांच्या प्रमुख उपस्थितीत विश्राम गु्ह सावनेर येथे संपन्न झाला.
सदर आयोजनात सत्कारमुर्तींचे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचे शाल, श्रिफळ, पुष्पगुच्छ व स्मृती चिन्ह देऊण सन्मानित करण्यात आले…
याप्रसंगी सत्कार मुर्ती वरिष्ठ पत्रकार मान्यवरांनी आपल्या काळातील पत्रकारिता व आजची पत्रकारिता यावर मार्गदर्शन करुण आपले अनुभव उपस्थित पत्रकारांशी अपले अनुभव वाटले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष राजु रणवीर यांनी सावनेर तालुका पत्रकर संघा व्दारे आयोजित आयोजन व त्याच्या निष्पक्ष पत्रकारिता बद्दल आभार मानुन पत्रकार हा लोकशाही चा चवथा आधारस्तंभ असुन या संगणक युगात प्रींट मीडाया ला भरपूर आव्हान मीळत असले तरी ग्रामीण पत्रकार आपला पत्रकारिता धर्म मोठ्या विश्वसनीयतेने पार पाडत लोकांच्या समस्या पुढे आणन्याचे कार्य करत असुन पत्रकार व शासकीय कर्मचारी यातील संबंध आदीवर प्रकाश टाकला…
या प्रसंगी प्रा.योगेश पाटील,किशोर ढुंढेले,लक्ष्मिकांत दिवटे,विनोद वासाडे,,निलेश पटे,रितेष पाटील, विनोद गुप्ता,विजय पांडे,पीयूष जिंजुवाडीयाँ,ईत्यादी पत्रकार बांधव प्रामुख्याने उपस्थित होते…
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.योगेश पाटील यांनी संचालन किशोर ढुंढेले यांनी तर आभार लक्ष्मिकांत दिवटे यांनी मानले…

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply