News

‘पहिला हप्ता रविवारी शेतकरी सन्मान निधीचा’

31Views

लखनऊ:-

‘पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी’ योजनेंतर्गत मोदी सरकार येत्या रविवारी २००० रुपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. गोरखपूर येथील शेतकरी मेळाव्यात मोदी एका क्लिकने देशातील १२ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २५ हजार कोटी रुपये ट्रान्सफर करणार आहेत.

मोदी सरकारनं यावर्षीच्या अर्थसंकल्पात छोट्या शेतकऱ्यांसाठी ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी’ योजना घोषित केली. शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देणारी ही योजना महत्वाची समजली जाते. या योजनेवर ७५ हजार कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये तीन हप्त्यांत दिले जातील. त्याचा पहिला हप्ता रविवारी देण्यात येईल. योजनेच्या अंमलबजावणीकरिता आवश्यक सर्व कामे झाली आहेत. एकट्या उत्तर प्रदेशात ९० लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, असं भाजप खासदार आणि किसान मोर्चाचे नेते विरेंद्र सिंह आणि राजा वर्मा यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितले.

योजनेचा ‘कसा’ लाभ घ्याल!

मोदी सरकारनं यावर्षीच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत दरवर्षी शेतकऱ्याला सहा हजार रुपये मिळणार आहेत. पाच एकराच्या आत जमीन असलेल्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. पाच एकराच्या आत जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल. शेतकरी कुटुंबाला दरवर्षी सहा हजार रुपये तीन हप्त्यांत मिळतील. त्यासाठी तलाठी अथवा ग्रामसेवकाकडे नोंदणी करावी लागेल. पाच एकराच्या आत जमीन असलेल्या म्हणजेच तलाठ्याकडे असलेल्या यादीतील शेतकऱ्यांनी नाव, गाव, वय, व्यवसाय, खाते क्रमांक, क्षेत्र, बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक यांसह घोषणापत्र भरून तलाठी अथवा ग्रामसेवकाकडे जमा करावे.

कोणती कागदपत्रे आवश्यक: 

आधार कार्ड (नसेल तर मतदान ओळखपत्र)

बचत खात्याच्या पासबुकची झेरॉक्स

काय काळजी घ्याल? 

जे बँक खाते सुरू आहे (आयएफएससी कोड असेल) अशा पासबुकची झेरॉक्स प्रत जोडावी.
ग्राम समितीकडून चुकून नाव न आल्यास तालुका समितीकडे अर्ज करता येईल.
ज्या शेतकऱ्यांनी अद्याप कागदपत्रे दिलेली नाहीत, त्यांनीच ही कागदपत्रे जमा करावीत. ज्यांनी यापूर्वी माहिती दिली आहे, त्यांनी पुन्हा माहिती देण्याची आवश्यकता नाही.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply