News

पाकच्या ५ चौक्या उद्ध्वस्त; पाक सैनिक जखमी.

57Views

जम्मू :-

भारतीय हवाई दलाच्या सीमेपलीकडील कारवाईनंतर बिथरलेल्या पाकिस्तानी लष्कराने नियंत्रण रेषेवर सुरू केलेल्या गोळीबाराला भारतीय लष्कराने जशास तसे उत्तर दिले आहे. यात भारतीय जवानांनी पाकिस्तानी लष्कराच्या ५ चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत. या कारवाईत पाकिस्तानचे अनेक सैनिक जखमी झाले आहेत. एका लष्करी अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

जम्मू-काश्मीरमधील राजौरी आणि पुंछ जिल्ह्याजवळील नियंत्रण रेषेलगत असलेल्या क्षेत्रात हा गोळीबार सुरू आहे. काल संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमाराला पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात पाकिस्तानी सैन्याने सर्वसामान्य नागरिकांचा आपल्या बचावासाठी उपयोग केल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्याने दिली.

अनेक पाक सैनिक जखमी

पाकिस्तानी सैनिकांनी सीमाभागात राहणाऱ्या लोकांच्या घरांमधून मोर्टार आणि मिसाइल डागल्याचे पाहिले गेल्याचेही अधिकारी म्हणाला. मात्र, भारतीय जवानांनी प्रत्युत्तर देताना पाकिस्तानी नागरिकांच्या वस्त्यांपासून दूर असणाऱ्या पाकिस्तानी चौक्यांना लक्ष्य केले. यामुळे अनेक पाकिस्तानी सैनिक जखमी झाले. दोन्ही बाजूंच्या गोळीबारात ५ भारतीय सैनिकही किरकोळ जखमी झाले आहेत. यांपैकी दोघांना उपचारासाठी लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply