nagpurruralUncategorized

पाकिस्तानात सत्तेवर राहिलेल्या मागील सरकारांनी पाकिस्तानात दहशतवाद आणि दहशतवादी संघटनांना प्रोत्साहन दिले:इम्रान

7Views

इस्लामाबाद :-

पाकिस्तानात सत्तेवर राहिलेल्या मागील सरकारांनी पाकिस्तानात दहशतवाद आणि दहशतवादी संघटनांना प्रोत्साहन दिले, असा स्पष्ट आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे. या आरोपाद्वारे दहशतवादाशी आपला काही संबंध नसल्याचे सतत सांगत आलेल्या पाकिस्तानला पंतप्रधान इम्रान खान यांनीच खोटे पाडत पाकिस्तानात दहशतवादी संघटना सक्रिय असल्याची कबुलीच दिली आहे. आपले सरकार पाकिस्तानात यापुढे कधीही दहशतवादी संघटनांना काम करू देणार नाही, अशी भूमिका घेत पंतप्रधान खान यांनी दहशतवादविरोधी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सिंधमधील थारपारकर जिल्ह्यात आयोजित एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान खान यांनी हे वक्तव्य केले आहे.

पूर्वीच्या सरकारांनी केव्हाही दहशतवादी संघटना आणि दहशतवाद्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. ‘तहरीक-ए-इन्साफ’ पक्षाचे सरकार सत्तेत आल्यानंतर आम्ही नॅशनल अॅक्शन प्लानवर गांभिर्याने विचार करत आहोत असे पंतप्रधान खान म्हणाले. या धोरणांतर्गत दहशतवाद आणि अतिरेकीपणा नष्ट करण्याचे काम सुरू करण्यात आल्याचेही ते म्हणाले.

पुलवामा दहशतवादी हल्ला ‘जैश-ए-मोहम्मद’ने घडवल्याचे उघड झाल्यानंतर या संघटनेवर कारवाई करण्यासाठी पाकिस्तानवर दबाव वाढत आहे. ही दहशतवादी संघटना पाकिस्तानात सक्रिय आहे. जैशचा म्होरक्या मसूद अजहर भारतीय संसदेवरील हल्ला, तसेच पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply