News

पाकिस्तान तोंडावर आपटले, एफ-१६ चे फोटो प्रदर्शित.

57Views
पाकिस्तान:

भारतीय हवाई दलाच्या माऱ्यामुळे कोसळलेल्या पाकिस्तानच्या एफ १६ लढाऊ विमानाच्या अवशेषांचे फोटो जाहीर करण्यात आले आहेत. यासोबतच पाकिस्तान सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी दिलेल्या खोट्या विधानांची पोल खोल झाली आहे.

भारतीय हवाई दलाच्या एअरस्ट्राइक नंतर एकाच दिवसात पाकिस्तानची लढाऊ विमानं भारतीय सीमेत घुसली. या विमानांना भारतीय हवाईदलाने चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय हवाई दलाच्या माऱ्यात पाकिस्तानचे एफ१६ विमान कोसळले आणि तुटले. तर त्याच्या पायलटला मात्र पॅराशूटने उतरावं लागलं. या तुटलेल्या विमानाच्या इंजिनाचे फोटो एएनआयने जाहीर केले आहेत. हे पाकिस्तानच्या सेव्हन नॉर्थ इन्फंट्रीचे विमान आहे. हे विमान पडल्यावरचे फोटो प्रदर्शित करण्यात आले आहे.

काल पाकिस्तानचे मेजर जनल आसिफ गफूर यांनी पाकिस्तानचे काहीच नुकसान झाले नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. तसंच पाकिस्तानची जी लढाऊ विमानं भारताच्या सीमेत घुसली त्यात एकहा एफ१६ विमान नव्हतं असंही त्यांनी सांगितलं होतं. पण आता त्या ‘नसलेल्या’ विमानाचेच फोटो जाहीर झाले असल्यामुळे पाकिस्तान सपशेल तोंडावर आपटलं आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply