News

पाक पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात लाहोर उच्च न्यायालयात याचिका.

9Views
लाहोरः 

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना अपात्र ठरवावे, अशी मागणी करणारी याचिका लाहोरच्या उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेच्या सुनावणीस उच्च न्यायालय तयार झाले असून, सोमवारी या याचिकेवर सुनावणी होणार आहे. यामुळे इम्रान खानयांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २०१८ मध्ये पार पडलेल्या निवडणुकांवेळी पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्या उमेदवारी अर्जात आपल्या भागीदाराच्या मुलीशी असलेल्या सोयरीकीची माहिती दडवून ठेवली, असा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. पाकिस्तानी संविधानाच्या कलम ६२ आणि ६३ चे हे उल्लंघन असून, इम्रान खान यांना अपात्र ठरवावे, असं या याचिकेत म्हटले आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी असलेली व्यक्ती प्रामाणिक आणि चांगल्या वृत्तीची असावी, असे हे कलम सांगते.

इम्रान खान यांना टायरियन जेड खान व्हाइट नावाची मुलगी आहे आणि या मुलीबाबत त्यांनी आपल्या उमेदवारी अर्जात माहिती दिली नाही. ही मुलगी पूर्वाश्रमीच्या पत्नी ऐना लूसिया व्हाइट यांची आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. अवलंबून असणाऱ्या माणसांविषयी माहिती देताना त्यांनी ही बाब दडवली असून, हे कायद्याचं उल्लंघन ठरतं, असे काही प्रसारमाध्यमांचे म्हणणे आहे.

दरम्यान, या वर्षीच्या जानेवारी महिन्यात अशाच प्रकारची याचिका इस्लामाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र, ही व्यक्तिगत बाब आहे, असं सांगत ती याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply