Uncategorized

पिंपरी शहालीत शेतकरी आत्महत्या.

34Views

 नेवासे;- 

 

व्याजाने दिलेली रक्कम व्याजासह परतफेड करूनही जमीन नावावर करून देण्यास सावकाराने नकार देऊन नेवासे तालुक्यातील पिंपरी शहाली येथील भालकर कुटुंबाची फसवणूक केल्याने शेतकरी अशोक भालकर याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली.

या प्रकरणी सुनीता अशोक भालकर यांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, पिंपरी शहाली शिवारात गट नंबर ९१ मध्ये साडे तीन एकर शेतजमीन आहे. दीर गोरक्ष श्यामराव भालकर यांच्या नावावर याच गट ९१ मध्ये साडे तीन एकर शेतजमीन आहे. पती अशोक यांना शेतीच्या कामासाठी तसेच लोकांचे उसने घेतलेले पैसे देण्यासाठी शेवगाव तालुक्यातील दहिगाव येथील सावकार कारभारी श्रीपती आढाव याने आमची शेत जमीन गट नंबर ९१ मधील ४० आर जमीन कायम खरेदी खताने २२ मार्च २०१७ रोजी दिली होती. त्याच बरोबर गट नंबर ९१ मधील पती अशोक याची २० आर व दीर गोरक्ष यांची ६० आर अशी एकूण ८० आर जमीन कारभारी आढाव याने स्वतःची पत्नी कडूबाई कारभारी आढाव हिच्या नावे करून घेऊन अशोक भालकर यांना ५ लाख ५ हजार रुपये उसने दिले होते. घेतलेले पैसे तीन टक्के व्याजासह परत दिल्यावर शेतजमीन पुन्हा नावावर करून देतो, असे सांगितले. खरेदी केलेल्या शेत जमिनीपैकी माझे पती अशोक यांच्या नावावरील ४० आर ही जमीन तलाठ्यामार्फत सात-बाराच्या उताऱ्यावर स्वतःच्या नावावर केलेली आहे. कडूबाई यांच्या नावावरील खरेदी केलेली ८० आर जमीन त्याने त्याच्या पत्नीच्या नावावर करून घेतलेली आहे.

शेतजमीन खरेदी केल्यावर सावकार आढाव हा आमच्या घरी दर महिन्याला येऊन व्याजाचे पैसे घेऊन जात असे, असे साधारण वर्षभर चालल्यानंतर सावकार आढाव याने व्याजाची रक्कम ५ टक्के दराने द्यावी, अशी मागणी केली. त्यानंतर माझे पती यांच्याकडे असलेले ५ लाख ५ हजार रुपये माझे भाऊ सुहास गंगाधर घोडेचोर, शरद गंगाधर घोडेचोर यांच्याकडून घेऊन सावकार कारभारी आढाव यास परत केले. तरीही व्याजाचे पैसे जास्त होतात ते दिल्याशिवाय आमची खरेदी केलेली जमीन नावावर करून देणार नाही, असे म्हणून टाळाटाळ करू लागला. यामुळे माझे पती अशोक यांना मानसिक त्रास होत होता. सावकाराने फसवल्यामुळे ते तणावात होते. ६ सप्टेंबर रोजी रात्री साडे आठच्या सुमारास दीर गोरक्ष भालकर यांनी अशोक शेतात बेशुद्ध पडलेले असल्याचे सांगितल्यावर, आम्ही त्यांना घरी आणले. ग्रामीण रुग्णालय नेवासे फाटा येथे घेऊन गेलो असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अशोक यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. दिलेल्या फिर्यादीवरून सावकार कारभारी श्रीपती आढाव व त्यांची पत्नी कडूबाई कारभारी आढाव (दोघेही रा. शेवगाव) यांच्याविरुद्ध नेवासे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक गौतम वाबळे तपास करीत आहेत.

Mehul Rahangdale
the authorMehul Rahangdale
Editor

Leave a Reply