News

पुन्हा एकदा सलमान आणि संजय भन्साळी एकत्र काम करणार आहेत.

44Views

मुंबई: –

सलमान -ऐश्वर्याची केमिस्ट्री आणि संजय लीला भन्साळीचे दिग्दर्शन हे समीकरण जुळले आणि ‘हम दिल दे चुके सनम’ सुपरहिट ठरला. या चित्रपटानंतर पुन्हा एकदा सलमान आणि संजय भन्साळी एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटाचे नाव ‘हम दिल दे चुके सनम २’ ठेवण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

संजय लीला भन्साळी यांनी आपल्या नव्या चित्रपटाची कथा सलमानला ऐकवली आहे. सलमानलादेखील ती आवडल्याने त्यानं होकार कळवलाय. या नव्या चित्रपटाचे नाव जरी ‘हम दिल दे चुके सनम २’ ठेवण्यात येणार असले तरी हा चित्रपटाचा सिक्वेल नसेल. ‘हम दिल दे चुके सनम’सारखीच ही एक लव्ह स्टोरी असल्याने असं नाव ठेवण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

सलमान सध्या आगामी ‘भारत’च्या चित्रीकरणात व्यग्र आहे. ‘भारत’चे चित्रीकरण संपतानच तो भन्साळींच्या नव्या प्रोजेक्टचे काम सुरू करणार आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply