News

‘पुरावे मागणाऱ्यांना १०० ग्राम बॉम्ब द्या’

80Views
दिल्ली: 

भारतीय हवाईदलाने केलेल्या बॉम्बवर्षावाचे कोणी पुरावे मागितले तर त्यांना १०० ग्रामचा बॉम्ब द्या, असा सणसणीत टोला प्रसिद्ध कवी व आम आदमी पक्षाचे माजी नेते कुमार विश्वास यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लगावला आहे. केजरीवाल यांनी ‘उरी’ हल्ल्यानंतर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागितले होते. त्या अनुषंगानं विश्वास यांनी हे ट्विट केलं आहे.
२०१६मध्ये उरीवर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर भारतीय सैन्याने दहशतवाद्यांच्या तळावर सर्जिकल स्ट्राइक केला होता. भारतातील काही राजकीय नेत्यांनी या स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. केजरीवाल यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन या हल्ल्याचे पुरावे देण्याची मागणी केली होती. त्याचा थेट उल्लेख न करता विश्वास यांनी केजरीवाल यांना टोला हाणला आहे. ‘आजच्या हवाई हल्ल्याचे कोणी पुरावे मागितले तर त्यांना १०० ग्रामचा बॉम्ब द्या,’ असं कुमार विश्वास यांनी म्हटलं आहे.

कुमार विश्वास हे काही दिवसांपूर्वीपर्यंत आम आदमी पक्षाचे नेते होते. ‘आप’च्या तिकिटावर अमेठीमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींविरोधात कुमार विश्वास यांनी २०१४च्या लोकसभेची निवडणूकही लढवली होती.

इम्रान खान यांनाही टोला

कुमार विश्वास यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनाही सुनावले आहे. ‘शांतीचा पांढरा रंग आवडत नाही, पण ‘हा’ लाल रंग त्यांना निश्चितच आवडेल,’ असं विश्वास यांनी म्हटलं आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply