News

पोलिसावर कुऱ्हाड, दगडाने हल्ला

16Views

मेरठ (उत्तर प्रदेश)  :-

गोहत्येच्या संशयावरून बुलंदशहरात झालेल्या हिंसाचारात पोलीस निरीक्षक सुबोध कुमार सिंह यांच्यावर संतप्त जमावाने कुऱ्हाड आणि दगडाने हल्ला केला होता. सुबोध कुमार यांच्यावर पाठीमागून कुऱ्हाडीने हल्ला केल्यानंतर त्यांच्यावर गोळी झाडली होती, असे पोलीस अधिकारी प्रभाकर चौधरी यांनी म्हटलं आहे.

या प्रकरणात मुख्य आरोपी प्रशांत नट हा असून त्यानं संतप्त जमावाला भडकावले होते. संतप्त जमावाने कारला आग लावली होती. सुबोध कुमार यांच्या हत्येप्रकरणी नट आणि त्याच्या चार साथीदाराला पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली आहे. कलुआ नावाच्या आरोपीनं सर्वात आधी पोलीस निरीक्षक सुबोध कुमार यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला होता, व त्यानंतर तो फरार झाला आहे. संतप्त जमावाला शांत राहण्याचं आवाहन सुबोध कुमार करत असताना कलुआने त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला, यात ते गंभीर जखमी झाले होते, असे चौधरी यांनी सांगितलं आहे.

संतप्त जमावाकडून दगडफेक करण्यात आल्यानंतर जीव वाचवण्यासाठी सुबोध कुमार यांनी गोळी झाडली. ती गोळी सुमीत नावाच्या एका तरुणाला लागली व त्यात त्याचा मृत्यू झाला, असे एसआयटीच्या तपासातून समोर आले आहे. आंदोलनकर्त्यांनी आणि प्रशांत नट याने सुबोध कुमार यांची पिस्तुल हिसकावण्याचा प्रयत्न केला. नट यानं सुबोध कुमारवर गोळीबार झाडली व तेथून पळ काढला. एकाच बंदुकीतून सुबोध यांच्यावर दोनदा गोळी झाडण्यात आल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे, असे एसआयटीच्या तपासातून समोर आले आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply