News

पोलीस भरतीसाठी आलेल्या चौघींना कारने उडवले |

92Views

मुंबई:  सध्या महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस भरती प्रक्रिया सुरू असून, त्याअंतर्गत मुंबईत उमेदवारांची धावण्याची चाचणी घेण्यात येत आहे. ही चाचणी पूर्ण करून विक्रोळी स्थानकाकडे जात असताना चार तरुणींना एका कारने उडवले. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची मुंबईतील पूर्व द्रुतगती मार्गावर सर्व्हिस रोडवर धावण्याची चाचणी घेण्यात येत आहे. ती सकाळी ११ वाजता पूर्ण झाली. त्यानंतर काजल करडे, दीपाली काळे, चित्राली पांगे आणि चैताली दोरगे या तरुणी विक्रोळी स्थानकाकडे जात होत्या. त्याचवेळी एका भरधाव कारने या चौघींना उडवले. यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विक्रोळी पोलिसांच्या माहितीनुसार, आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास पूर्व द्रुतगती मार्गावर घोडा गेट सिग्नलजवळ चैताली दोरगे आणि तिच्या तीन मैत्रिणी रस्ता ओलांडत होत्या. त्याचवेळी भरधाव कारने त्यांना धडक दिली. यात त्या गंभीर जखमी झाल्या. या प्रकरणी चैतालीनं विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, कारचालकास अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply