nagpurruralNews

प्रकाश नगर वसाहतीत स्वच्छता अभियान रॅली *खापरखेडा औष्णिक विज केंद्राचा उपक्रम |

265Views

दिलीप गजभिये  (प्रतिनिधी )
खापरखेडा –  परिसर स्वच्छ असले की आरोग्य नांदत या संकल्पनेतून खापरखेडा औष्णिक वीज केन्द्राने शुन्य कचरा प्रकल्प अभियान उपक्रम सुरू केला. सदर उपक्रमा अंतर्गत स्वच्छ, सुंदर, प्लास्टिकमुक्त व हिरवीगार सुगंधित वसाहत साकार करण्यासाठी खापरखेडा औष्णिक वीज केंद्राच्या प्रकाशनगर वसाहतीत 10 मार्च शनिवारला स्वच्छता रॕली आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्य अभियंता राजेश पाटील, उपमुख्य अभियंता फुलझले, राऊत, कार्यकारी अभियंता हेमंत रंगारी, शेगावकर, डॉ मिलिंद भगत यांच्यासह मोठया संख्येने अधिकारी, अभियंता, कर्मचारी वर्ग आदी प्रामुख्याने उपस्थित होते याप्रसंगी  स्वच्छता अभियान रॕलीत शंकरराव चव्हान इंग्लिश प्रायमरी स्कुलच्या विद्यार्थी व विद्यार्थीनींनी स्वच्छतेवर सुंदर पथनाट्य सादर करून जनजागृती केली तर महाराष्ट्र विद्यालयाच्या विद्यार्थीनींनी पारंपारिक वेशभूषेत लेझिम पथक सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.सदर रॅलीत महिलांनी हिरव्या रंगाच्या साड्या परिधान करून हिरव्यागार वसाहतीचा संदेश दिला .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश भेंडेकर, सुमीत बळवाईक, हर्षद ओक, शंकर घोरसे, किशतीजा घाडगे, निळे आदींनी अथक परिश्रम घेतले.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply