EntertainmentNews

प्रकाश राज लोकसभा निवडणूक लढणार

21Views

मुंबई:-

रजनीकांत आणि कमल हासन यांच्या राजकीय प्रवेशानंतर आणखी एक दाक्षिणात्य स्टार राजकारणाच्या वाटेवर आहे. सिंघम चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणारे अभिनेते प्रकाश राज यांनी नववर्षाचं औचित्य साधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र त्यांचा मतदारसंघ कोणता असणार आहे हे मात्र गुलदस्त्यात आहे.

प्रकाश राज यांनी ट्विटरवर नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतानाच त्यांच्या राजकीय प्रवेशाची घोषणा केली. ‘तुमच्या पाठिंब्यामुळं मी अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवणार आहे. लवकरच मी माझ्या मतदारसंघाची माहिती देईन,’ असं ट्वीट त्यांनी केलं आहे. तर, ‘अब की बार जनता की सरकार’ असं म्हणत भाजप सरकारला टोला लगावला आहे.

कर्नाटकमध्ये येदियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर प्रकाश राज यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. तसंच गौरी लंकेश हत्या प्रकरण आणि कठुआ प्रकरणावर केलेल्या विधानामुळं चांगलाच वाद निर्माण झाला होता.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply