nagpurruralNews

प्रबोधनातून पटनाट्यद्वारा दिला स्वच्छतेचा कानमंत्र..!

राष्ट्रीय सेवा योजनाअंतर्गत शिलादेवी महाविद्यालयाचा उपक्रम....!

77Views

गोंडखैरी :
प्रतिनीधी-दिलीप ठाकरे
नजीकच्या धामणा (लिंगा) शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात वाडी येथील शीलादेवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रिय सेवा योजनाअंतर्गत प्रबोधन व शिबीरांचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी,शिक्षकांनी व समाजसेवक वसंतदादा कुंभारे यांनी शैक्षणिक किर्तनातुन जनजागृतीअंतर्गत स्थानिकांना व विद्यार्थीं पालकांना दिला स्वच्छतेचा कानमंत्र.
राष्ट्रीय सेवा योजना चे शिबीर धामना (लिंगा) येथे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात यशस्वीरित्या संपन्न झाले. या शिबीरात राष्ट्रीय सेवा योजनाअंतर्गत विद्या‍र्थी स्वयंसेवकांनी व्यसनमुक्ती, पर्यावरण संवर्धन ,जल सुरक्षा इत्यादि विषयावर तसेच स्वच्छता रैलीच्या माध्यमातून समाज जा‍गृती केली.
यासोबतचआमंत्रित मार्गदर्शकांद्वारे व्यक्तिमत्व विकास व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्यात आले. धामना येथील शाळा व कनिष्ठ महाविद्यालय धामना येथे समाजसेवक वसंतदादा कुंभारे यांनी शैक्षणिक कीर्तनातुन व पटनाट्यद्वारा प्रबोधन केले. यावेळी गावाचे सरपंच मा.वर्षाताई भलावी ,समाज सेवक बेहरे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.पवन भागवत तसेच मंदिराचे पुजारी, इतर मान्यवर, गावकरी, सहयोगी प्राध्यापक व शिक्षक-शिक्षिका तसेच विद्या‍र्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
याप्रसंगी वाडी येथील शिलादेवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य डाँ. लता खापरे, कार्यक्रम अधिकारी डाँ.कविता मते यांनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका रंजना भोयर, सहाय्यक शिक्षक हेमराज काळे, श्रीराम वडूरकर,निळकंठ बोपटे, राजेंद्र दुधबडे, दयाराम चौधरी, उमेश कट्यारमल, लेखनदास किटुकले, दिलीप लाखे, प्रदिप भाजीखाये, सुरेंद्र वानखेडे, शिक्षकेत्तर कर्मचारी संजय खांडेकर, देवराव वासेकर, आकाश देपट,अंकुश शेंडे, विनोद क्षिरसागर, ओंकार गजभियेसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply