News

प्रेक्षकांना भेटायला रणवीर पोहोचला थिएटरच्या छतावर.

25Views

मुंबई: अभिनेता रणवीर सिंगच्या मनात कोणती गोष्ट येईल आणि तो कधी काय करेल याचा नेम नसतो याचा प्रत्यय त्याच्या चाहत्यांना पुन्हा एकदा आला आहे. सिम्बाच्या एका प्रयोगानंतर रणवीर चक्क चित्रपटगृहाच्या छतावर चढून नाचू लागला आणि चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

सिम्बा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी चित्रपटाला डोक्यावर घेतले. आपल्या चित्रपटाला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद जाणून घेण्यासाठी रणवीर सिंग आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी वांद्रे येथील गॅलेक्सी चित्रपटगृहात पोहोचले. चित्रपट संपल्यावर प्रेक्षक बाहेर आले आणि चित्रपटाच्या हिरोला समोर पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. प्रेक्षकांचा उत्साह पाहून रणवीरच्या उत्साहाला उधाण आले आणि तो शिडीवर सरसर चढून चक्क चित्रपटगृहाच्या छतावर पोहोचला. त्याने तिथे गाण्यावर डान्सदेखील केला आणि आपल्या प्रेक्षकांशी संवादही साधला.

आपला लाडका अभिनेता आपल्या समोर आहे हे पाहून चाहत्यांनादेखील हा क्षण कॅमेऱ्यात टिपण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे हा व्हिडिओ काही तासात सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply