EntertainmentNews

बलात्काराच्या आरोपानंतर आलोक नाथ आजारी.

44Views
मुंबई:-

बॉलिवूडमध्ये सुरू असलेल्या #MeToo च्या वादळात दररोज नवनवे धक्कादायक आरोप होत आहेत. ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ यांच्यावर अभिनेत्री विनता नंदा यांनी बलात्काराचा आरोप केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. विनता यांच्या आरोपानंतर आलोक नाथ यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती समोर आली आहे.

आकोलनाथ यांचे वकील अशोक सरावगी यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. ‘आलोकनाथ आजारी असल्याने ते सध्या आपल्यासमोर येऊ शकत नाहीत. विनता यांच्या आरोपामुळे त्यांना मानसिक धक्का बसला आहे. येत्या एक-दोन दिवसात ते स्वत: माध्यमांसमोर आपली बाजू मांडतील, असं सरावगी यांनी सांगितलं. विनता यांनी केलेले आरोप खोटे असल्याचही सरावगी यांनी स्पष्ट केलं.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply